मुस्लिमांनी बाबरीवरील हक्क सोडावा ; शिया धर्मगुरुचे आवाहन

संग्रहित छायाचित्र

मुंबई- राममंदिर – बाबरी मशिद प्रकरणी जर सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांविरोधात निर्णय दिला, तर वादग्रस्त बाबरी मशिदीच्या जागेवरील दावा मुस्लिमांनी राममंदिरासाठी सोडून द्यावा, असे आवाहन शिया धर्मगुरु मौलाना कल्बे सादिक यांनी केले आहे. जरी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला तरी मुस्लिमांनी शांततेने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करावा, असे ते म्हणाले मुंबईमध्ये आयोजित जागतिक शांतता सौहार्दाच्या परिषदेमध्ये ते बोलत होते.

वादग्रस्त जागेसंदर्भात हिंदूंच्या भावना अधिक तीव्र आहेत. त्यामुळे मुस्लिमांनी या जागेवरील आपला दावा मागे घ्यावा, असेच आवाहन आपण मुस्लिम समाजाला करू. असे केल्याने मुस्लिम समाज लक्षावधी लोकांची मने जिंकू शकेल, असे त्यांनी नंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आपल्या निकटवर्तीयांना दिलेल्या वस्तूच्या हजारोपटींनी अधिक तुम्हाला परत मिलते हे तत्व मुस्लिमांनी ध्यानात ठेवावे. दयाळूपणे दिल्याने सर्वशक्तिमानाची दया प्राप्त होते, हे मुस्लिमांमधील विचारवंतांना माहित आहे, याची आठवण मौलाना कल्बे सादिक यांनी करून दिली. उत्तर प्रदेश शिया वक्‍फ बोर्डाने नुकतेच सर्वोच्च न्यायालयात आपली बदललेली भूमिका मांडली होती. मशिद मुस्लिम लोकवस्तीमध्ये आणि वादग्रस्त जागेपासून दूर बांधली जावी अशी आपली भूमिका असल्याचे सुधारणावादी मत वक्‍फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये व्यक्‍त केले होते. या पार्श्‍वभुमीवर सादिक यांनीही तसेच मत व्यक्‍त केल्याने या आवाहनालाही विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)