मुसांडवाडीतील विकासकामे मार्गी लावणार

आ. बाळासाहेब पाटील : विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रम

म्हासुर्णे – कराड-उत्तर मतदारसंघातील मुसांडवाडी गावाची विकासकामे प्राधान्याने मार्गी लावली जातील,या भागातुन जात असलेल्या उरमोडीच्या पोटपाटाचे काम लवकरच मार्गी लागेल तसेच आज गावामध्ये गणी भाईच्या नावाने चौकास नामंकर केल्यामुळे त्यांच्या स्मृती जागृत राहणार असल्याचे मत आ. बाळासाहेब पाटील यांनी व्य्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुसांडवाडी, ता. खटाव येथे गणी भाई चौक नामकरण सोहळा व विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते
यावेळी समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, माजी पंचायत समिती सभापती संदीप मांडवे, मार्केट कमिटीचे माजी सभापती सी. एम. पाटील, वडगावचे सरपंच संतोष घार्गे, व्हा.चेअरमन विलास शिंदे, महादेव माने, चेअरमन राजेंद्र माने, भिकाजी कटे, सुरेश घाडगे, अधिकराव माने आदींची प्रमुख उपस्थित होती.

आ. पाटील म्हणाले, या परिसरातील वाडीवस्तींना लागणाऱ्या कामांसाठी येणाऱ्या काळामध्ये भरीव निधीची तरतुद केली जाईल. या गावात आजपर्यंत लाखो रुपयांची कामे केली आहेत. आता काही दिवसात इलेक्‍शनचे वारे वाहू लागल्यानंतर काहीजण येतील. त्यांच्या भुलथापांना बळी पडु नका. मागील निवडणुकीत दिडशे कोटीचा डंका करणाऱ्यांनी विकास कामांचे नारळ फोडले पण विकास कुठे दिसला नाही.

शिवाजीराव सर्वगोड म्हणाले की, या मतदारसंघामधील प्रत्येक गावामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून कामे झालेली आहेत. त्यामुळे आपणही त्याच्या मागे खंबीरपणाने उभे राहिले पाहिजे. या विभागातून घरकुल, घरघंटी, पिठाची चक्की सारखे वैयक्तिक लाभ ही या विभागातून गावामध्ये केलेले आहेत.

यावेळी सुरज शेख, जैनुद्दीन पटेल, जलाऊद्दिन पटेल, सलमान पटेल, उसमान शेख, रामहरी मोरे, किसन इंगळे राजेंद्र इंगळे, चॉंद पटेल, तुषार मोरे, शहाआलम पटेल, अरमान पटेल, रियाज पटेल, संजय मोरे, पै.अक्षय घाडगे, हणमंत मोरे, सुनिल इंगळे, संतोष मोरे, संकेत मोरे आदी ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होते. प्रास्ताविक खुदबुद्दीन पटेल यांनी केले. आभार उपसरपंच आसिफ मुलाणी यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)