मुसळधार पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत

बहुतेक शाळा आणि कार्यालयांना सुट्टी
पावसाने विमानसेवा बंद; प्रवाशांचे हाल
मुंबई  :
 मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक सेवेवर झाला आहे. रेल्वेचा वेग मंदवलाय तर विमान सेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.
शहरात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने पाण्यातून रस्ता शोधण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. जोरदार पावसामुळे नेहमी धावणाऱ्या मुंबईचा वेग आज मंदावलेला दिसत आहे. पावसामुळे अनेक कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. तर शाळांनादेखील सुटी जाहीर करण्यात आली आहे.
पावसाने आज सकाळपासूनच मुंबईला झोडपण्यास सुरुवात केली. मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला जोरदार झोडपले आहे. जोरदार पावसामुळे लालबाग, हिंदमाता, परळ भागात पाणी साचले असून रस्त्यांना अक्षरक्ष: नद्यांचे स्वरुप आले आहे. गेल्या २४ तासात १५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर भागात
दरम्यान, कसारा येथे रुळावरील माती बाजुला करताना डोक्यात ओव्हरहेड वायर पडल्याने रेल्वेचे सहा कंत्राटी कामगार जखमी झाले. ही घटना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सीएसटी ते टिटवाळा आणि कसारा ते आसनगाव लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही अन्य मार्गे वळवल्या आहेत. रेल्वे सेवा पूर्ववत होण्यास उद्याची सकाळ उजाडेल, असे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)