मुसळधार पावसाचा अमरनाथ यात्रेला अडथळा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत असून अमरनाथ यात्रा काही वेळासाठी थांबविण्यात आली आहे. पाऊस थांबेपर्यंत यात्रेकरूंना बालटाल आणि पहलगाम येथील कॅम्पमध्ये थांबवण्यात आले आहे.

अमरनाथ यात्रेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. यात्रेकरुंची पहिली तुकडी जम्मूतील भगवतीनगर बेस कॅम्पमधून रवाना झाली. या तुकडीत एकूण 1904 भाविकांचा समावेश आहे. यंदा यात्रेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, दहशतवादी संघटन हिज्बुल मुजाहीद्दीनने अमरनाथ यात्रेकरुंना सुरक्षेचे आश्वासन दिल्याची माहिती आहे. अमरनाथ यात्रेकरु आमचे पाहुणे आहेत, त्यांच्यावर हल्ला करण्याचा आमचा कोणताही विचार नाही असे हिज्बुल मुजाहीद्दीनने एक कथित ऑडिओ क्लिप जारी करुन म्हटले आहे. अमरनाथ यात्रेला सुरूवात होण्याच्या एक दिवस आधीच हिज्बुल मुजाहीद्दीनने एक ऑडिओ क्लिप जारी केल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)