मुशर्रफ यांच्या विरोधीतील खटल्याची आता दैनंदिन स्वरूपात होणार सुनावणी

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी हुकुमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या देशद्रोहाच्या खटल्याची सुनावणी आता दैनंदिन स्वरूपात होणार आहे. येत्या 9 ऑक्‍टोबर पासून हा खटला दैनंदिन स्वरूपात चालेल असा निर्णय आज विशेष न्यायालयाने दिला.

सन 2007 मध्ये देशात बेकायदेशीपणे आणिबाणी लागू करून मुशर्रफ यांनी देशाच्या विरोधात द्रोह केल्याच्या कारणावरून तत्कालिन नवाज शरीफ सरकारने हा खटला दाखल केला आहे. सन 2013 पासून या खटल्याची सुनावणी रडतखडत चालली होती. या खटल्याला लॉजिकल एंड पर्यंत नेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करीत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मुशर्रफ सध्या दुबईत आश्रयाला आहेत. त्यांना कोर्टापुढे हजर करण्यास सरकारी वकिलांना अपयश आले आहे. इंटरपोलनेही त्यांच्या विरोधात वॉरंट बजावण्यास नकार दिला आहे.

या पार्श्‍वभूमीवर मुशर्रफ यांची व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे साक्ष नोंदवता येईल काय अशी विचारणा आज न्यायालयाने सरकारी वकिलांना केली. न्यायालयाने मुशर्रफ यांना फरारी घोषित करून त्यांची पाकिस्तानातील मालमत्ता जप्त करण्याचा आदेश या आधीच दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)