मुशर्रफ यांची निवडणूक लढवण्याची शक्‍यता संपली

सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल 

इस्लामाबाद – पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निवडणूका लढवण्याची पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची महत्वाकांक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुले धुळीला मिळाली आहे. मुशर्रफ यांना निवडणूक लढवण्यासाठी दिलेली सशर्त परवानगी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी मुशर्रफ उपस्थित न राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाने ही परवानगी रद्द केली. त्यामुळे आता मुशर्रफ यांना 25 जुलै रोजी होणारी निवडणूक लढवता येणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षी मार्च महिन्यात मुशर्रफ वैद्यकीय उपचारांसाठी दुबईला गेले आहेत. तेंव्हापासून ते पाकिस्तानला परत आलेले नाहीत. मुशर्रफ यांना न्यायालयाने निवडणूक लढवण्यासाठी सशर्त परवानगी दिली होती. त्यासाठी 13 जून रोजी होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहण्याची अटही न्यायालयाने घातली होती. त्यानंतर ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगच्या अध्यक्षांनी मुशर्रफ यांच्यावतीने गेल्या आठवड्यात चित्राल जिल्हातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)