मुळेवाडीत मेडिकल दुकानाला आग

मंचर -येथील आदित्य मेडीकल ऍन्ड जनरल स्टोअर्सच्या गोडाऊनला मंगळवारी (दि. 27) पहाटे आग लागून सुमारे 20 लाख रूपयांची सौंदर्य प्रसाधने, फर्निचर्स लॅपटॉप आदी माल जळून खाक झाला आहे. बहुधा ही आग विजेच्या शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मंचर-मुळेवाडी रस्त्यावर आदित्य मेडीकल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री दुकान बंद करून दुकानमालक नितीन निघोट घरी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाला आग लागुन धूर दिसल्याने आजुबाजुच्या नागरिकांनी नितीन निघोट यांना दूरध्वनीद्वारे आग लागल्याची माहिती दिली. नितीन निघोट आणि इतर सहकाऱ्यांनी शेतीपंपाचे पाणी आणि अग्नीशमन सिलेंडरद्वारे आगीवर मारा करून आग विझवण्यात यश आले. या आगीमध्ये सौंदर्य प्रसाधने, लॅपटॉप, फर्निचर्स आणि इनर्व्हटर जळून अंदाजे 20 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकानमालक नितीन निघोट यांनी व्यक्त केला. घटनास्थळी मंचर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)