मुळा-मुठेसाठी सरसावले शेकडो हात

साडेतीन हजार पुणेकर एकवटले : नदी दिनाचे औचित्य


महापालिकेका, जीवित नदी संस्थेतर्फे नदी स्वच्छता अभियान

पुणे – भारतीय नदी दिनाचे औचित्य साधत महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणा अंतर्गत मुळा-मुठा नदी स्वच्छता मोहिमेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. एकाच वेळी शहराच्या वेगवेगळ्या भागात 42 ठिकाणी ही मोहीम घेण्यात आली. त्यात सुमारे साडेतीन हजार पुणेकर सहभागी झाले होते.

42 ठिकाणी मोहीम


30 टन कचरा काढला


10 ट्रक राडारोडा संकलित

महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत पुणे महापालिका आणि जीवित नदी संस्थेच्या वतीने 1 डिसेंबरपासून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. याची सुरूवात दि. 25 पासून करण्यात आली. महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते याची सुरूवात करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक, नगरसेविका ज्योत्सना एकबोटे, स्वाती लोखंडे, मंजुश्री खर्डेकर, गायत्री खडके, ज्योती कळमकर, पूजा कोद्रे यांच्यासह नगरसेवक अनिल टिंगरे, योगेश समेळ, महामेट्रोसह, सुमारे 17 स्वयंसेवी संस्था त्यांचे सदस्य, शाळा, महाविद्यालये तसेच पुणेकर नागरिकही सहभागी झाले. यात नदीपात्रातून तब्बल 30 टन कचरा तसेच 10 ट्रकभरून राडारोडा आणि गाळ काढण्यात आला. शहराच्या वेगवेगळ्या 42 भागात एकाच वेळी ही मोहीम घेण्यात आली. याअंतर्गत मुठाई-मुळाई महोत्सव घेण्यात येणार असून त्यात महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांसाठी रिव्हर वॉक, महापालिका अधिकाऱ्यांसाठी रिव्हर वॉक, दर शनिवारी व रविवारी नागरी सहभागाने नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

-Ads-

12 ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता
शहरातील ज्या भागात नदी नाही, तेथे स्वयंसेवी संस्थाच्या वतीने सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबविल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले. महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत, स्वयंसेवी संस्थानी ही मोहीम राबविली असून यापुढेही स्वच्छता मोहीम सातत्याने राबवून घनकचरा व्यवस्थापनासाठी नागरिकांचा सहभाग वाढविला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)