मुळा-मुठावर जलपर्णीचे साम्राज्य

उरुळी काचंन- शहरातून येत असलेल्या मोठ्या प्रमाणातील दूषित पाण्यामुळे येथील मुळा-मुठा नदीपात्रावर जलपर्णीचे साम्राज्य वाढले आहे. नदीवरील जलपर्णीचा हा विळखा दिवसेंदिवस विस्तारू लागला असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिसरातील गावांच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
कोरेगाव मूळ आणि अष्टापूर, बिवरी गावांना जोडणाऱ्या मुळा-मुठा नदीवरील पुलाला लागून असलेल्या थेऊरपासून ते भवरापूरपर्यंत नदीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात जलपर्णी विस्तारली असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप यांनी दिली. या जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असून, सायंकाळच्या सुमारास येथील पुलावरून प्रवास करताना प्रवाशांना डासांचा सामना करावा लागत असल्याचे अष्टापूरचे शेतकरी अतुल कोतवाल यांनी सांगितले. गावातही मोठ्या प्रमाणात डास निर्मिती झाली आहे. अनेक वेळा या गावांमधील तरुण कार्यकर्त्यांनी यंत्राद्वारे आणि कधी होडीतून जलपर्णी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे पूर्ण निर्मूलन होऊ शकले नाही. ग्रामपंचायत आणि लघुपाटबंधारे खात्याने ही समस्या सोडविण्याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)