मुळा उजवा कालव्याला गवताने वेढले

नेवासा – तालुक्‍यातील मुळा उजवा कालवा पिकांबरोबरच तालुक्‍याची तहान भागवितो. मात्र, कालव्याला गवत व वेड्याबाभळीने वेढल्याने तो मरणासन्न अवस्थेत आला आहे. त्याच्या दुरुस्तीची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

“गवत दिसते चोहीकडे गेला कालवा कुणीकडे’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मुळा उजवा कालव्याचा काठ ढासळणे, कालवा फुटणे या घटना प्रत्येक आवर्तनावेळी घडत आहेत. पात्रामध्ये मोठी झाडेझुडपे व वेड्याबाभळी उगवल्याने कालव्याचे पात्र कमी झाल्याचे दिसून येते. गेली कित्येक वर्षे हा प्रश्न भेडसावत आहे. दुरुस्तीच्या नावावर लाखो रुपये खर्च होत असताना परिस्थितीत मात्र कुठलाही बदल होत नसल्याचे दिसून येते.

टेल-टू-हेड शेती पिकांना पाणी मिळण्याची घोषणा त्यामुळे हवेतच विरत आहे. भविष्यात शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळेल की नाही, अशी भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे. पाटबंधारे विभागाने त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. कालवा फुटीच्या घटनांकडे मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)