मुळा उजवा कालव्याच्या पाण्याची मागणी

गोपाळपूर – नेवासा तालुक्‍यातील गेवराई, वाकडी, शिरसगाव, गोपाळपूर, वरखेड भागाला मुळा धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी न मिळाल्याने पिके करपू लागली आहेत.

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून राहुरी, नेवासा तालुक्‍यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे पिके करपत आहेत. उजव्या कालव्याचे पाणी मिळाले तरच पिके वाचणार आहेत. टेलच्या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी आमदारांबाबत नाराजी व्यक्‍त करत आहेत. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुळा कालव्यातून टेलच्या भागाला पाणी मिळवून द्यावे, अशी मागणी वरखेड, गेवराई आणि परीसरातील शेतकरी करत आहेत.

महालक्ष्मी पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष गणेश ढोकणे म्हणाले की, पाणी मिळावे ही गेवराई, वरखेड परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. मागील तीन वर्षांपासून महालक्ष्मी पाणीवापर संस्था पाण्यापासून वंचित आहे. आमदारांचे दुर्लक्ष आणि पाटबंधारे खात्याचा सावळागोंधळ यामुळे परिसरातील शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)