मुळाच्या पाण्यापासून टेलचा भाग वंचित

रोटेशन बंद झाल्याने पाणी मिळण्याच्या आशा संपुष्टात: अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या मनमानी
गोपाळपुर – मुळा धरणातून शेतीसाठी 1 मे पासून 40 दिवसांचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले होते. आता आवर्तन बंद झाले. तरी “टेल’ चा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाकडी, शिरसगाव, गोपाळपुर या भागातील शेतक-यांना पाणी मिळाले नाही. यामुळे हाताशी आलेली पिके डोळ्यादेखत जळून चालली आहे. तरी पण तालुक्‍याच्या लोकप्रतिनीधिंना याचे काहीच वाटत नाही.
“टेल टू हेड’ असा नियम असतानाही वरचा भागातील लोकांना आधी पाणी दिले व रोटेशन संपले तरी टेलच्या भागातील शेतक-यांना पाणी न मिळाल्याने पिके जळून गेली आहे. अधिकारी वर्गावर तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधी चा वचक नसल्याने अधिकारी वाटल तसे वागतात यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी जाहीरपणे सांगतात कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही तरी टेलच्या भागाकडे ते जाणीवपूर्वक दूरलक्ष करत आहे.
यांचे अधिका-यांवर नियंत्रण नसल्याने अधिकारी अर्थपूर्ण व्यवहार करून पाण्याची नासाडी करत आहे. पाण्याबाबत शेतक-यांनी विचारणा केली तर येईल पाणी, होईल भरणे असे उत्तर मिळत. परंतु आता पाणीच बंद झाले तर भरणे तरी कसे होणार याबाबत विचारणा केली असता धरणातील पाणी संपले म्हणून अधिकार्यांनी वरहात केले आहे.
लोकप्रतिनिधी मुग गीळुन गप्प बसले आहे. पाऊस लांबल्यामुळे व पाणी बंद झाल्याने पिके सुकून चालली आहे. या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे. नाही तर जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई येथे सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा लाभधारक शेतक-यांनी दिला आहे. तरी तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी काहीच बोलायला तयार नाही हे विषेश.
मुळा धरणातून रोटेशन सुटल्यानंतर लोकप्रतिनिधीनी सर्व अधिकार्यांवर वचक ठेऊन व्यवस्थित नियोजन केले. तर येणाऱ्या पाण्यात तालुक्‍यातील सर्व शेतकर्यांचे भरणे होईल.सर्व बंधारे भरले जातील, परंतु तसे न करता अधिकार्यांना मोकळे सोडून हे काहीच करत नाही.अधिकारी अर्थपूर्ण व्यवहार करून वरच्या भागातच पाण्याची नासडी करतात यामुळे टेल पर्यंत पाणी येत नाही.
या भागातील शेतकरी भरडला जात आहे. येणाऱ्या काळात मान्सून वेळेवर आला नाही तर पिके जळून खाक होतील व शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होईल. एक तर पिकांना मिळणारा कमी भाव,साखर कारखान्याने ऊसाचे थकवलेले पेंमेट,लांबणीवर पडलेला मान्सून यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असता मुळाचे पाणी मिळाले नाही म्हणून आता त्याच्यावर आत्मदहन केल्याशिवाय पर्याय उरला नाही. याकडे शासन लक्ष देणार का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)