मुळाचे आवर्तन बंद झाले, तर आंदोलन

आमदार चंद्रशेखर घुले : खरीप हंगामातील पिकांचे भरणे होवू देण्याची मागणी

शेवगाव  – खरीप पिकाचे सर्व भरणे झाल्याशिवाय मुळाचे पाटपाण्याचे आवर्तन बंद करू, नये अन्यथा लाभार्थी शेतकऱ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी दिला आहे. हक्‍काच्या पाटपाण्यासाठी किती दिवस संघर्ष करावा, असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
गेल्या महिन्यापासून खरीप पिकासाठी मुळाचे आवर्तन चालू आहे. मात्र अद्याप पाथर्डी कालव्यांतर्गत येणाऱ्या डीवाय व 3 च्या अनेक लाभधारक शेतकरी अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे पाटपाण्यासापासून वंचित आहेत. याबाबत चारी क्रमांक दोनचे पाणी बंद केल्याने येथील शेतकऱ्यांनी नगर येथील कार्यकारी अभियंता यांच्या दालनात जावून ठिय्या आंदोलन केले. आपण आंदोलनाचा इशारा दिल्याने या चारींतर्गत येणा-या वडूले, दिंडेवाडी, गरडवाडी, बऱ्हाणपूर, ढोरजळगाव, आव्हाणे खुर्द, बुद्रुक, मळेगाव, सामनगाव गावासाठी पुन्हा पाणी सोडण्यात आले.
चारी क्रमांक तीनवरील अमरापूर, फलकेवाडी, वडूले, भगूर या गावातील लाभार्थी क्षेत्र पूर्णपणे भरलेले नाही. यातील टेलच्या गावांनाही आजपर्यंत पाणी मिळालेले नाही. आता हे पाणी बंद करून ते अन्यत्र सोडणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. ऊस पिकावर हुमनी, कपाशी पिकावर बोंडअळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच पिकाला पाटपाणी मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
शेतकऱ्यांवर एकीकडे आस्मानी संकट तर दुसरीकडे पाटपाण्याचे सुलतानी संकट ओढवले आहे. पिकांसाठी पाणी न मिळाल्यास या भागातील शेतकऱ्यांना घेवून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा घुले यांनी दिला आहे.
बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, सुधाकर चोथे, राजेंद्र देशमुख, कारभारी लांडे, सुभाष वाणी, विष्णू वाणी, साईनाथ गरड, साहेबराव आंधळे, कांता रणमले, हरिभाऊ काळे, शिवाजी कापरे, सुदाम झाडे, बाळासाहेब दिंडे, दत्तू दिंडे, भगवान गरड, वसंत भालेराव, पांडू नागरे, लक्ष्मण नागरे, रवींद्र सातपुते, संदीप सातपुते, विजय पोटफोडे, बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, कांता निकम आदींसह शेतकरी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)