मुळशी पॅटर्न ; गुंठामंत्रीही झाले कंगाल

संग्रहित छायाचित्र

पुणे : जमिनीच्या विक्रीतून पैसे मिळत असल्याने कुटूंबातील तरुण पिढीचाही शेती करण्याऐवजी जमीन विक्रीकडेच कल वाढला होता. मात्र कुटूंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा जमीन विक्रीस विरोध होता. ही बाब दलालांना अडथळा निर्माण करणारी होती. यामुळे अनेकदा घराघरांमध्ये फुट पाडणे, बनावट दस्तऐवज तयार करुन जमिनी लाटणे, दमदाटी व धाक दाखवून व्यवहार करण्यास भाग पडणे असे प्रकार सुरू झाले होते. यानंतर जमिनीच्या दलालीच्या कमिशनमधून तसेच पैशांच्या वादातून काही खूनही पडले होते.

व्यवहारामागे तब्बल दहा ते पंधरा टक्के कमिशन आकारले जात होते. स्थानिक गुन्हेगारांबरोबरच मुंबई व पुण्यातील काही टोळ्याही या दलालीच्या व्यवसायात घुसल्या होत्या. यामुळे येथील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. पोलीस हतबल होते किंवा राजकीय दबावाखाली होती. व्यवहारामागे तब्बल दहा ते पंधरा टक्के कमिशन आकारले जात होते. यामुळे दलालही पैशाने गब्बर होऊन राजकारणात किंवा बांधकाम व्यवसायात घुसले होते. हेच लोण हळूहळू जिल्हयाच्या इतर भागातही पसरले होते. या काळात जमीन विकून गब्बर झालेले गुंठामंत्री मात्र आज कंगाल झाल्याची स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)