‘मुळशी पॅटर्न’चा फास, गिळतोय जमिनींचा घास !

शिल्लक जमिनीही दलालांच्या नावे; अनेक कुटूंबेही संपली


पुर्नविक्रीच्या फंड्यातून दलाल मात्र दिवसेंदिवस गब्बर

संजय कडू

पुणे – साम-दाम-दंड-भेद सर्व पर्यायांचा अवलंब करुन शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करणे. यानंतर चढ्या भावाने त्या बड्या बांधकाम व्यावसायिकांना किंवा राजकीय व्यक्तींना विकणे. हा प्रकार सन 1995 दरम्यान मोठ्या प्रमाणात मुळशी तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात सुरू होता. या दलालीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात पैसा मिळू लागल्याने मुंबई व पुण्यातले गॅंगस्टरही दलालीच्या व्यवसायात घुसले होते. यामुळे खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी अशा प्रकाराने मुळशी परिसर तेव्हा हादरला होता. रिअल इस्टेट व बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्या खुनानंतर हा ‘मुळशी पॅटर्न’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

-Ads-

पुणे शहराचा विस्तार वाढत असताना उपनगरेही अपुरी पडू लागली होती. यामुळे भविष्यातील संधी लक्षात घेऊन राजकीय नेते आणि बड्या बांधकाम व्यावसायिकांची नजर मुळशी, पौड, सिंहगड, नसरापूर, धायरी, वडगाव-मावळ या परिसराकडे वळली होती. या परिसरात सन 1990 नंतर जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार वाढू लागले. जमिनीची मागणी लक्षात घेऊन प्रथम गावातीलच काही मंडळी मध्यस्थांचे काम करू लागली. पुण्या मुंबईतील व्ययवसायिकांकडून चांगली दलाली मिळत असल्याने काहींनी तर स्वत:हून बांधकाम व्यावसायिक व राजकीय नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरूवात केली. शेतकऱ्यांच्या जमिनी एकत्र करुन त्या विकायचा हा दलालीचा धंदा मोठ्या प्रमाणात फोफावू लागला होता. यामुळे दलालांमध्ये स्पर्धाही सुरू झाली होती. यातून मिळणारा पैसा लक्षात घेऊन काही संघटीत टोळ्यांचे म्होरकेही या दलालीकडे वळाले. तर काही राजकीय नेत्यांनी स्थानिक गुडांना हाताशी धरुन जमिनीची खरेदी सुरू केली.

मुळशी पॅटर्न ; गुंठामंत्रीही झाले कंगाल

मुळशी पॅटर्न ; शेतकऱ्यांच्या जमिनी राहिल्याच नाहीत

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)