मुळशी धरणातून शहराला पाच टीएमसी पाणी द्या : अजित पवार

पाण्याचा प्रश्‍न सुटून शेतीसाठीही पुरेशे मिळेल

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 24 – वाढते औद्योगीकरण आणि नागरिकरणामुळे शहरातील पाण्याचा वापर वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे शहरातील पाणी प्रश्‍नावर चर्चा झाली. त्यावेळी मुळशी धरणातून 5 टीएमसी शहराला पिण्यासाठी मिळाले पाहिजे. त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल आणि शेतीसाठीही पुरेशे पाणी मिळेल, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.

खडकवासला धरण साखळीतील पाण्याबाबत आमदार दत्ता भरणे यांच्यासह काही मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा झाली. त्यावेळी खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर इंदापूर, दौंड आणि हवेली यांचाही हक्‍क आहे. त्यांनाही पाणी मिळाले पाहीजे. पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देताना शेतीकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी समन्वयाची भूमिका या चर्चेत घेण्यात आली. जिल्ह्यात शंभर टक्‍के शौच्छालये आहेत. त्यामुळे पाण्याचा वापरही वाढल्याचे आपण नाकारू शकत नाही. मी अधिक वर्ष या खात्याचा मंत्री होतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीला पाणी मिळणे आवश्‍यक आहे.

मुळशी धरणाचे पाणी हे मोठ्याप्रमाणात टाटाकडे विजनिर्मितीला जाते. त्यातील पाच टीएमसी पाणी हे पुण्याला प्यायला मिळाले पाहीजे. त्यामुळे शेतीला पाणी देता येईल. पूर्वी कोयना धरणातूनच वीज निर्मिती होत होती. मात्र, आता विविध प्रकारातून वीजनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे थोडी कमी वीज निर्मिती झाली तरी फारसा फरक पडणार नाही. उलट नागरिकांना पिण्याचे पाणी मिळेल. या पूर्वीच्या जाणकारांनी सांगून ठेवले आहे की, पाण्यामुळे गावागावांत, राज्यांमध्येच नव्हे तर देशादेशांमध्ये वाद होतील. कारण, पाणी हे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शेतीमध्ये ठिबक सिंचन सुरू केले.

…………..
सध्या चुकीच्या पीक पध्दतीमुळे जमीनीचा पोत कमी होत आहे, हवामान बदल, नैसर्गिक संकट, दुष्काळ, पिकांवर किड्यांची लागण, गारपीट यामुळे पिकांचे नुकसान वाढले आहे. असे असताना सरकार मत मिळवण्यासाठी पिकांना दीड पट भाव देऊन असे आश्‍वासन देतात. मात्र, सत्तेवर आल्यावर दीडपट भाव दिले नाही. सध्या साखर, कांदा, बटाटा, तुरडाळ यांची काय अवस्था आहे. उत्पादक आणि ग्राहक या दोघांना परवडले अशी व्यवस्था पाहीजे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)