मुळशी तालुक्‍यातही बंदचा परिणाम

पिरंगुट- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा परिणाम मुळशी तालुक्‍यात दिसून आला. एरवी गर्दीने गजबजलेल्या तहसीलदार कार्यालयात आज शुकशुकाट होता महसूल विभागाबरोबरच मुळशीतील ग्रामसेवक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी या सहभागी झाले आहे. आज मंगळवार (दि. 7) तालुक्‍याचे मुख्य ठिकाण असलेल्या पौड गावचा बाजार असतो. तालुक्‍यातील सर्वच सरकारी कार्यालये येथे आहेत. अनेकांना सरकारी कार्यालये बंद असल्याची कल्पना नसल्याने काम न झाल्याने माघारी परतावे लागले. पुढील दोन दिवस हा संप चालू राहणार असल्याने प्रशासकीय कामावर याचा परिणाम जाणवणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)