मुळशी खुर्दमध्ये विवाहित महिलेची आत्महत्या

पिरंगुट- पती गणपतीचे साहित्य खरेदी करायला येत नाही, म्हणून मुळशी खुर्द (ता.मुळशी) येथे एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामध्ये शितल निवृत्ती कानगुडे (वय 22) या महिलेचा मृत्यू झाला आहे.
पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शीतल यांचा विवाह फेब्रुवारी 2017 मध्ये मुळशी खुर्द येथील निवृत्ती कानगुडे यांच्याशी झाला होता. शुक्रवारी गणेशोत्सवासाठी किरकोळ खरेदी करण्यासाठी शितल यांना जायचं होतं. पती किरकोळ साहित्य खरेदी करायला येत नाही, म्हणून शितल यांनी स्वतःच्या घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.या आशायाची चिठ्ठी त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली होती. आत्महत्या केलेल्या शितल यांचा मृतदेह शनिवारी सकाळी आठच्या दरम्यान राहत्या घरी मिळून आला. तो मृतदेह नातेवाईकांनी पौड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केला परंतु येथे एकच डॉक्‍टर शवविच्छेदन करण्यासाठी उपस्थित असल्याने त्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालय येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शितल यांच्यावर मुळशी खुर्द येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. या घडलेल्या घटनेची खबर शितल यांचे पती निवृत्ती कानगुडे यांनी पौड पोलीस स्टेशनला दिली होती. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिरूध्द गिजे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)