“मुळशी किताब’चा मानकरी ठरला इंदापूरचा महारूद्र काळेल

‘अमृता केसरी ‘ साईनाथ रानवडे ः घोटवडेत जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा

पिरंगुट- घोटावडेफाटा (ता. मुळशी) येथील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत “मुळशी किताब’ साठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या कुस्ती सामन्यात इंदापूरच्या महारूद्र काळेलने इंदापूरच्याच हर्षद कोकाटेवर 6-0 अशा गुणांनी मात करत मुळशी किताब मिळविला, तर “अमृता केसरी’ किताबासाठी झालेल्या निकाली कुस्तीत मुळशीच्या साईनाथ रानवडेने अहमदनगरच्या राजेंद्र राजमानेवर मात केली. विजेत्या महारूद्रला काळेलला रोख 31 हजार रुपये आणि चांदीची गदा, तर उपविजेत्या हर्षदला 21 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
एकूण सहा वजनगटात भरविलेल्या या स्पर्धेचे उद्‌घाटन माजी सभापती तुकाराम हगवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शांताराम इंगवले, बाबा कंधारे आदी मान्यवर उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभास संग्राम थोपटे, राजेंद्र हगवणे, शंकर मांडेकर, सुचित्रा आमले, गंगाराम मातेरे, संतोष मोहोळ, राजेंद्र बांदल आदी उपस्थित होते.
मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक भास्कर मोहोळ, अध्यक्ष सुनील चव्हाण, कार्याध्यक्ष शरद पवार, बाळासाहेब आमले यांनी संयोजन केले होते. स्पर्धेसाठी एकूण अडीच लाखांची बक्षिसे वितरीत करण्यात आली. सव्वाशेहून अधिक मल्लांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पंच म्हणून चंद्रकांत मोहोळ, रवी बोत्रे, विठ्ठल मोहोळ, हनुमंत मणेरे, किसन बुचडे, रोहिदास आमले, विक्रम पवळे, नीलेश मारणे आदींनी काम पाहिले. यावेळी आंतरराष्ट्रीय योगपटू श्रेया कंधारे, कोमल घारे, राष्ट्रीय धावपटू संपदा बुचडे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतीक्षा सुतार यांना मुळशीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • स्पर्धेतील वजनगटनिहाय प्रथम व द्वितीय क्रमांकप्राप्त मल्ल
    74 किलो – रवींद्र करे (इंदापूर ), अक्षय चोरघे (मुळशी), 70 किलो – तुकाराम शितोळे (हवेली), अरुण खेंगळे (खेड), 65 किलो – योगेश्वर तापकीर (खेड) , सुरज सातव (हवेली). 61 किलो – निखील कदम (दौंड), अभिजीत शेंडगे (वेल्हा). 57 किलो – किरण शिंदे (बारामती), स्वप्निल शेलार (बारामती).
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)