मुळशीत साश्रू नयनांनी गौराई गणपती बाप्पांना निरोप

हिंजवडी – गौराई व गणपतीच्या विसर्जनासाठी मुळा नदी काठी हजारो भाविकांनी आज गर्दी केली होती. पावसाने उघडीप दिल्यामुळे विसर्जन करणे भाविकांना सुकर झाले. मुळशीत भाविकांना साश्रू नयनांनी गौरी-गणपतीस निरोप दिला.

बाप्पांच्या आगमनाने फुलून गेलेला भक्तिचा मळा आज विसर्जनावेळी मात्र उदास होत असल्याचे भासत होते. बाप्पा येणार, बाप्पा येणार म्हणता म्हणता विसर्जनही येऊन ठेपले. त्या लाडक्‍या बाप्पाला आज भरे, ता.मुळशी येथे निरोप देण्यासाठी हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पिरंगुट, घोटवडे फाटा, शिंदेवाडी, अमराळेवाडी, कासार आंबोली, सुतारवाडी, हिरानगर, घोटवडे, अंबडवेट, भरे आदि परिसरातील हजारो भाविक येथे विसर्जासाठी आले होते.

भरे पुलावर मोठी गर्दी झाल्याने वाहतूक संध्याकाळी 4 ते 9 दरम्यान खोळंबली होती. पाऊस कमी झाल्यामुळे मुळशी धरणातून पाणी सोडणे कमी झाले होते. यामुळे मुळा नदीचा पूर बऱ्याच अंशी ओसरला होता, परंतु विसर्जनासाठी नदीत भरपूर आणि वेगाने वाहणारे पाणी होते. त्यामुळे विसर्जनावेळी मुळशीकरांची होणारी त्रेधा तिरपीट टळली होती. त्यामुळे वाहनातुन मोठ्या प्रमाणावर लोक येथे आले होते. यात लहान मुले, स्त्रिया यांचा लक्षणीय सहभाग होता. कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)