मुळशीत शहर परिवर्तन कार्यशाळा

दोन लाखांचा खर्च : आयुक्‍तांसह 50 जणांचा सहभाग
पिंपरी – स्मार्ट सिटी अभियानाचे कामकाज निश्‍चित वेळेत पूर्ण करणे व कामकाजात गतिमानता येण्याच्या दृष्टीने सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफीस (सीटीओ) उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाबाबत स्पष्ट धोरण आखण्यासाठी महापालिकेतील सर्व अधिकाऱ्यांची मुळशीतील गरूड माची येथे शुक्रवार (दि. 29 ) आणि शनिवार (दि.30) कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत आयुक्तांसह सर्व विभाग प्रमुख आणि पॅलॅडियम ग्रुपचे सदस्य असे 50 जण सहभागी होणार आहेत.
महापालिका माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत जेएनएनयुआरएम, स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजना तसेच कॉपोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलीटी सेल (सीएसआर) सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफीस (सीटीओ) अमृत योजना आदी विविध योजनांचे कामकाज करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी अभियानाचे कामकाज निश्‍चित वेळेत पूर्ण करणे व कामकाजात गतिमानता येण्याच्या दृष्टीने या कामकाजासाठी सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफीस (सीटीओ) उभारण्यात आले आहे.
“सीटीओ’ कार्यालयाच्या कामकाजासाठी स्पष्ट धोरण आखण्यासाठी महापालिकेतील सर्व अधिकाऱ्यांची मुळशीतील गरूड माची येथे 29 आणि 30 जून रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला जाण्या-येण्यासाठी 50 आसनांची बस व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवासी वाहतूक खर्च 20 हजार रूपये होणार आहे. कार्यशाळेत कॉन्फरन्स हॉल, प्रोजेक्‍टर, साऊंड सिस्टीम, मायक्रोफोन्स, स्लाईड चेंजर, व्हाईट बोर्ड, पाणी व्यवस्था, 50 जणांचे चहापान, दुपारचे व रात्रीचे जेवण, राहण्याची व्यवस्था, यासाठी अंदाजे 1 लाख 90 हजार रूपये तसेच इतर खर्च 15 हजार रूपये असा एकूण सव्वा दोन लाख रूपये खर्च होणार आहे. हा खर्च रोख स्वरूपात करायचा असल्याने थेट पद्धतीने केला जाणार आहे. हा खर्च आगाऊ स्वरूपात माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफीस या लेखाशिर्षातून खर्च करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)