मुळशीतून विक्रम, तानाजीची निवड

महाराष्ट्र केसरीसाठी तालुका निवड चाचणी उत्साहात

हिंजवडी- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मुळशी तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धा माण (ता. मुळशी) येथे पार पडली. यामध्ये गादी विभागातून पिरंगुटच्या विक्रम पवळे आणि माती विभागातून आंदगावच्या मुन्ना उर्फ तानाजी झुंझुरके यांची निवड झाली आहे. हे मल्ल आता पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत खेळणार असून त्यामध्ये निवड झालेले मल्ल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2018 साठी पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
या कुस्ती स्पर्धेचे उद्‌घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते ऍड. शिवाजी जांभुळकर, भोर-वेल्हे-मुळशी युवक अध्यक्ष राहुल जाधव, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, शिवाजी बुचडे, सुरेश पारखी व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेचे आयोजन शिवकृपा उद्योग समुहाचे पै. संदीप पारखी यांनी केले होते. स्पर्धेच्या बक्षीस वितरणास ऑलंपिकवीर मारूती आडकर, ट्रीपल महाराष्ट्र केसरी डीवायएसपी विजय चौधरी, रुस्तम ए हिंद अमोल बुचडे, शंकर मांडेकर, प्रसिद्ध कुस्ती निवेदक शंकर पुजारी, प्रा. किसन बुचडे, नवनाथ पारखी, संतोष मोहोळ, प्रकाश भेगडे, हलगीवादक संजय आवळे, नंदु भोईर उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून वस्ताद किरण बुचडे, पांडुरंग खानेकर, विठ्ठल मोहोळ, चंद्रकांत मोहोळ, रोहिदास आमले, सागर तांगडे, निलेश मारणे, विक्रम पवळे, गणेश मारणे, हेमंत शितोळे, हनुमंत मनेरे यांनी काम पाहिले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)