मुळशीतील गावांत सौरदिव्यांची व्यवस्था

शिरगाव : येथे अरुणा अरगडे यांनी स्वखर्चातून सौरदिव्याची केलेली व्यवस्था.

पिरंगुट- पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विशेष निधीमधून मुळशी तालुक्‍यातील विविध गावांमध्ये सौरदिवे बसविण्यात आले आहेत. मुळशी तालुक्‍यामध्ये विविध गावांमध्ये सौर दिव्यांची व्यवस्था करावी अशी मागणी मुळशी तालुका भाजपा युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी पालकमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली असता त्यानुसार विशेष निधीमधून मुळशी तालुक्‍यातील खारावडे, कोळवडे, माळेगाव, दासवे, रामनगर, भोईनी सिद्धेश्वर, रावडे, हुलावडेवाडी आणि पौड अशा विविध गावांमध्ये पंचवीस फूट लांबीच्या सौर दिव्यांच्या खांबांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे यातील काही अंधारमय गावे प्रकाशमय झाल्याने तेथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या विविध गावांमध्ये बसविण्यात आलेल्या सौर दिव्यांची बॅटरी ही उच्च प्रतीची असून या बॅटरीअंतर्गत यंत्रणेला जोडल्याने ती चोरीला जाण्याची शक्‍यता खूपच कमी आहे. यावेळी खारावडेच्या सरपंच मंदाकिनी मारणे, नामदेव चौधरी, महादेव मरगळे, केतन देशमुख, रोहित शेडगे, सुनील मरगळे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)