संग्रहित छायाचित्र

चिंबळी- विठ्ठल-रूख्मीणी व सावता महाराज मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा 42व्या वर्धापन दिनानिमित्त पद्मावतीनगर सावतामहाराज मंदिर चिंबळी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे बुधवार, दि. 18 ते 22 एप्रिलपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त रोज पहाटे 4 ते 6 काकड आरती महापूजा, सकाळी 8 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 12 ते 2 महिला भजन, 3 ते 6 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 5 ते 6 सामुदायिक हरिपाठ, रात्री 8 ते 10 कीर्तनसेवा त्यानंतर महाप्रसाद व संगीत भजनाचा हरिजागर असे कार्यक्रम होणार आहेत.

प्रेरणाताई जढर (बालकिर्तनकार आळंदी), रामेश्वर जाधव (देहू), सचिन चकवे (जुन्नर), बळीराममहाराज मेहूणकर (आळंदी) यांचे अनुक्रमे रोज रात्री तर व रविवारी (दि. 22) सकाळी 10 ते 12 पांडुरंगमहाराज साळुंखे (सांगली) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. यानंतर महाप्रसादानाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होईल. या कार्यक्रमाचे आयोजन पद्मावती भजनी मंडळ पद्मावती तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)