मुलुंडच्या संभाजी राजे मैदानावरील मिनी स्पोर्टस कॉम्प्लेक्‍सला स्थगिती

पालिकेला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश
मुंबई – मुलुंड पूर्वेकडील 19 हजार चौरस मीटरहून अधिक क्षेत्र असलेल्या संभाजी राजे मैदानावर कोट्यावधी रूपये खर्च करून मिनी स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स उभारण्याचा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तसेच याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश महापालीकेला दिले.

या मैदानावर पालीकेने मिनी स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स उभारण्याचा घाट घातला. त्या विरोधात माजी आमदार शिरीश शिंदे आणि दोघा स्थानिकांच्या वतीने ऍड. बाळकृष्ण जोशी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने मैदानाचा सर्व इतिहास न्यायालयासमोर सादर केला.स्थानिक नागरीकांसाठी तीन दशकापूर्वी केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीशी चर्चा करू मोकळ्या मैदानासाठी सुमारे 19 हजार मिटर जमीन मिळवून 1990 मध्ये संभाजी राजे मैदान उभारण्यात आले.

पालीकेने 2002मध्ये या मैदानाभोवती म्युझिकल जॉगिंग ट्रॅकची उभारणी केली. मात्र त्यानंतर चालू वर्षाच्या सुरुवातीला महापालिकेने मिनी स्पोर्टस कॉम्प्लेक्‍ससाठी मैदानाचे जवळपास 6 हजार मीटर इतके क्षेत्र विकसित करण्याचा आराखडा प्रसिद्ध करून या आराखड्यात फूटबॉल ग्राऊंड, स्केटिंग रिंक, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, बास्केट बॉल कोर्टसचा अंतर्भावासह अतिरिक्त जॉगिंग ट्रॅकची उभारणी करण्याचाही घाट पालिकेने घातला आहे. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना पालिकेचा हा आराखडा म्हणजे निव्वळ सार्वजनिक पैशांची उधळपट्टी असल्या दावा केला.

याची न्यायालयाने गंभर दखल घेऊन खंडपीठाने मैदानावरील प्रस्तावित मिनी स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स आणि कॉंक्रीटीकरणाला स्थगिती दिली. तसेच आराखड्यासंबंधी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश पालिकेला देत याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)