मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्याचा जामीन फेटाळला

पुणे-जीवे मारण्याची धमकी देत एका 12 वर्षीय मुलीशी तब्बल एक वर्षाच्या कालावधीत अश्‍लील चाळे केल्याप्रकरणात 45 वर्षीय व्यक्‍तीचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा आदेश दिला आहे. आनंद सुरेश ढेणे (रा. वारजे), असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी वारजे पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना दि. 28 जुलै आणि त्यापूर्वीच्या एक वर्षाच्या कालावधीत वारजे परिसरात घडली. पीडितेला ढेणे हा परिचित आहे. केसाची मालिश करायची आहे, असे सांगून तो तिला त्याच्या घरी घेऊन जायचा. तिच्याशी अश्‍लील चाळे करायचा, त्यानंतर तिला खाऊ द्यायचा, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी ढेणे याला अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्‍त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. जामीन मिळाल्यास तो पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्‍तीवाद ऍड. पाठक यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)