मुलीविरोधातच फिर्याद

चोरीप्रकरणी युवतीस अटक

कोरेगाव- सातारारोड येथे खुद्द आईनेच मुलीच्या विरोधात चोरी केल्याची फिर्याद दिली. याप्रकरणी संबंधित मुलीस पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारारोड येथील विचारे चाळीतील तस्मीन उर्फ तस्लीम हमीद शेख (वय24) ही दिनांक 13 ऑगस्टपासून घरातून गायब होती. त्यामुळे तिची आई शहानाज हमीद शेख हिने सातारारोड दूरक्षेत्रात माझी मुलगी तस्मिन शेख ही गायब असून घरातील सोन्याचे मणी, कर्णफूल व रोख रक्कम असा एकूण दहा हजारांचा सातशे रुपयांचा मुद्देमाल चोरून घेऊन गेली असल्याची फिर्याद दाखल केली होती. सातारारोड पोलीस तस्मिन हीचा चोरीच्या गुन्ह्यात शोध घेत होते. दि. 3 रोजी सातारारोड पोलिसांनी तिला अटक केली. तिला कोरेगाव न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)