मुलीची छेड काढणाऱ्या फाळकुट दादांच्या हातात बेड्या

मेढा पोलिसांची कारवाई: छेडछाडीचा जाब विचारल्याने नातेवाईकांना मारहाण

सातारा,दि.8(प्रतिनिधी)

-Ads-

मुलीला सतत छेडछाड करून त्रास देणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. मेढा शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या युवतीची काही युवकांनी छेड काढली होती. त्याचा जाब विचारला म्हणून मुलीच्या नातेवाईकांना मारहाण करणाऱ्या अमर गाडेकर, समीर जाधव,रूषीकेश जाधव,उमेश सुतार,किरण दशरथ जाधव या फळकुट दादांच्या हातात मेढ्याचे स.पो.नि. जीवन माने यांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत युवती ही मेढा शहरातील एका महाविद्यालयात शिकण्यास आहे. संशयीत आरोपी हे तिची वारंवार छेड काढत होते. भर रस्त्यात तिच्यापुढे चिठ्ठ्या टाकत तिला त्रास देत होते. त्यामुळे घाबरलेल्या युवतीने याची माहिती भावाला दिली.

त्यावर तिच्या भावाने मेढा शहरातील वेण्णा चौकात आरोपींना घडल्या प्रकाराचा जाब विचारला. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी तक्रारदारच्या घरी जात नातेवाईकांना मारहाण केली. त्यावेळी भांडण सोडवण्यास आलेल्या वृध्दांना धक्काबुकी सुध्दा या गुंडांनी केली. याप्रकरणी अमर शत्रुघ्न गाडेकर, समीर सुरेश जाधव,रूषीकेश एकनाथ जाधव (सर्व रा. भणंग,ता. जावली) यांच्या विरोधात गुन्हा दअखल झाला असून त्यांना दि.10 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

——————————————————-
कडक कारवाईची मागणी
जावलीला लाभलेला इतिहास अन्‌ अमर शत्रुघ्न गाडेकर, समीर सुरेश जाधव,रूषीकेश एकनाथ जाधव यांच्यासारख्यांची गुंड प्रवृत्ती यांचा ताळमेळसुध्दा बसत नाही. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेसाठी तरी पोलिसांनी कोणाताही दबाव न घेता कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
—————————————-
सामाजिक अन्‌ राजकीय कार्यकर्त्यांच्या भूमिका काय ?
मेढ्यात एका युवतीची छेड काढली जाते. त्याचा जाब विचारणाऱ्या नातेवाईकांना मारहाण करण्याचे धाडस आरोपी करतात. जर तालुक्‍यात मुली सुरक्षित नसतील तर कसे होणार? असा सवाल विचारत तालुक्‍यातील सामजिक व राजकीय कार्यकर्ते नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)