पुणे: मुलींशी अश्‍लील चाळे; पुजाऱ्याचा जामीन फेटाळला

पुणे – सात वर्ष आणि अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलींसोबत अश्‍लिल चाळे करून त्यांचा विनयभंग करणाऱ्या 50 वर्षीय पुजाऱ्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा आदेश दिला आहे.

हेमंत रामचंद्र काटेकर उर्फ तात्या (वय 50, रा. यश सोसायटी, दापोडी) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलींच्या वतीने एका महिलेनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 26 एप्रिल रोजी सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान आणि त्यापूर्वी वेळोवेळी पीडित मुलींच्या राहत्या घरी घडला.

हेमंत काटेकर हा खडकी बाजार येथील मारुती मंदीर येथे पुजारी आहे. त्याने सात आणि अकरा वर्षाच्या पीडित मुलींशी खेळण्याचा बहाणा करून त्याच्यासोबत अश्‍लिल चाळे केले. याबाबत पीडित मुलींच्या घरच्यांना याबाबत समजल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार हेमंत याला 4 मे रोजी अटक करण्यात आली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जाला अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. हेमंतने केलेले कृत्य समाजविघातक आहे. त्याने यापूर्वीही असे कृत्य केल्याचे मुलींनी त्यांच्या जबाबामध्ये सांगितले आहे. तो अशा प्रकारे कृत्य करण्यास सरसावलेल्याचे दिसून येत असून त्याला जामीन मिळाल्यास तो पुन्हा अशा प्रकारचे कृत्य करण्याची शक्‍यता आहे. जामिनावर सोडल्यास फिर्यादी, पीडित मुलगी, तसेच इतर साक्षीदार यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. तसेच त्यांना साक्ष देण्यापासून परावृत्त करण्याची देखील शक्‍यता आहे. जामीन मिळाल्यास तो फरार होण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तीवाद ऍड. बोंबटकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)