मुलींप्रमाणे मुलांवरही बंधने लादण्याची गरज – अश्विनी जगताप

पिंपरी – मुलींच्या सुरक्षेसाठी आपण त्यांच्यावर विविध प्रकारची बंधने घालतो. त्यांच्यावर संस्कार चांगले करतो. त्यांना खूप जपतो. परंतु, मुलींसारखेच आपण आपल्या मुलाकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. ज्या प्रकारे मुलींवर बंधने घालतो, त्याप्रकारे मुलांवरही घातली गेली पाहिजेत, असे मत प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी जगताप यांनी व्यक्त केले.

जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शहरातील कर्तृत्ववान महिलांचा भरारी पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार महेश लांडगे, ऐश्वर्या रेणुसे-जगताप, जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका तथा स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश मीठभाकरे, भाजप महिला मोर्चा प्रदेश सदस्य उमा खापरे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, अनुराधा गोरखे, नगरसेवक शीतल शिंदे, कुंदन गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, भाजप युवा मोर्चाचे अनुप मोरे, भाजप शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अश्विनी जगताप म्हणाल्या, बाहेरच्या बिघडलेल्या वातावरणामुळे घरात मुलगी असणारे प्रत्येक कुटुंब तिची फार काळजी घेत असतात. सुरक्षेसाठी तिच्यावर विविध प्रकारची बंधने घातली जातात. मुलींवर चांगले संस्कार केले जातात. परंतु, आता मुलावरही मुली इतकेच चांगले संस्कार करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक कुटुंबाने मुलीप्रमाणे आपल्या मुलालाही तो कुठे जातो, त्याचे मित्र कोण, तो कोणत्या वातावरणात फिरतो, तो काय करतो, विचारले पाहिजे. त्यामुळे चांगली पिढी निर्माण होईल आणि आपला भारत देश घडेल. महिलांनी आपल्या मुलांना भारतीय जेवणाची गोडी लावावी. जंकफूडच्या जमान्यात कुटुंबाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे आवश्‍यक आहे. फास्टफूडच्या जमान्यात म्हाताऱ्या झाल्या तरण्या आणि तरण्या झाल्या म्हाताऱ्या या म्हणीसारखी अवस्था होऊ नये, यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याला जपावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

आमदार महेश लांडगे, सीमा सावळे, ऐश्वर्या रेणुसे-जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी ऊर्मिला पाटील (स्कूल बस चालक), मुन्नी पांडे (कष्टकरी महिला कामगार), सारीका पवार, मीना मस्के, उल्का कुटे, निलीमा पाचपोर, इशा मुंशी, सुजाता भोईटे, शारदा रिकामे यांना “भरारी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक आशा धायगुडे-शेंडगे यांनी केले. सूत्रसंचालन पूजा डफळ यांनी केले. सारंग कामतेकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)