मुलींनी शिक्षणाचा वसा कायम ठेववा

कुरवली- आज स्त्री घराला घरपण देऊन चूल आणि मूल ही संकल्पना मोठ्या हिमतीने साकारत आहे. मुलींनी आपला शिक्षणाचा वसा कायम ठेवून आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी केले.
कुरवली (ता. इंदापूर) येथील कर्मयोगी शंकरराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्मार्ट गर्ल अंतर्गत सस्नेह माता पालक मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्‌घाटन एस. बी. पाटील प्रतिष्ठानच्या विश्‍वस्त अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी सरपंच शोभा पांढरे, चिखली सरपंच सुवर्णा भंडलकर, उद्घट सरपंच वैशाली थोरात, तावशी सरपंच सीमा सपकळ, मानकरवाडी सरपंच अर्चना तुपे, शोभा चव्हाण, कल्पना गायकवाड, तांबेवाडी सरपंच वर्षा ऐवळे, हनुमानवाडी सरपंच हिराबाई कारंडे, लासुर्णे सरपंच निर्मला चव्हाण, शोभा गायकवाड, राणी थोरात, पोलीस पाटील अनुपमा खरात, जांब पोलीस पाटील शीतल बागाव, परीटवाडी पोलीस पाटील मोनाली कोळेकर आदी पंचक्रोशीतील महिला सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्तीच्या अध्यक्षा तसेच परिसरातील महिला-पालक उपस्थित होते.
प्रारंभी लेझीम पथकाच्या सहाय्याने पाहुण्यांचे स्वागत करून पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आजची स्त्री या विषयावर प्राध्यापिका सविता मारकड यांनी आकाशाला गवसणी घालणारऱ्या स्त्री शक्तीचा महिमा वर्णन केला. प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे स्त्रीच असते हे पटवून दिले. तसेच महिलांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये पारंपरिक वेशभूषेवर आधारित कॅटवॉक, नृत्याविष्काराचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गणेश घोरपडे, सूत्रसंचलन शिक्षक बाळासाहेब मोरे, संदीप पवार यांनी केले तर संतोष कदम यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)