मुलींच्या वसतिगृहासाठी दिले 12 लाख

परिंचे-वीर (ता. पुरंदर) येथील अस्तित्व प्रतिष्ठान वसतिगृहात मुलींच्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अस्तित्व संस्थेच्या वसतिगृहात मुलींना राहण्याची अपुरी जागा असल्यामुळे मुलींना वर्गात झोपावे लागत आहे. त्यामुळे आशा फॉर एज्युकेशन या संस्थेच्या वतीने वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी 12 लाख रुपयांचे अनुदान दिले असल्याचे प्रतिष्ठानचे सचिव संतोष वाघ यांनी सांगितले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना क्रांतीकुमार पाटील यांनी वसतिगृहात असलेल्या निराधार मुलांशी संवाद साधला. अस्तित्व संस्थेच्या कामाचे कौतुक करून वसतिगृहाच्या परिसरात सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीतांजली देगावकर, प्रतिष्ठानचे विश्वस्थ पल्लवी वाघ, मुख्याध्यापक संजय पिलाने, शिक्षक प्रवीण रोकडे, रोशन कोळी, सासवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)