मुलींचे शिक्षण, आरोग्य, संस्कार हीच खरी संपत्ती – सुनंदा पवार

भवानीनगर- मुलींचे शिक्षण, आरोग्य, संस्कार हीच खरी संपत्ती समजून महिला पालकांनी मुलींच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. “स्वस्थ कन्या, स्वस्थ भारत’ अभियानांतर्गत इंदापूर तालुक्‍यातील तावशी येथील माध्यमिक विद्यालय या ठिकाणी शालेय महिला आणि माता पालक यांच्याशी संवाद साधत सुनंदा पवार यांनी “स्वस्थ कन्या, स्वस्थ भारत’ अभियानाचा कानमंत्र देत आज शेकडो मुली आणि माता पालक यांच्याशी संवाद साधला.
मासिक पाळी याबाबत ग्रामीण भागातील महिला आणि मुली यांच्यात संवाद नसल्याने वयात आलेल्या मुलींच्या आरोग्याच्या अनेक अडचणी आहेत. याच अडचणी लक्षात घेऊन अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती या संस्थेच्या वतीने हे अभियान पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यात राबविण्यात येणार असून, आज बारामती, पुरंदर, इंदापूर या तीन तालुक्‍यातील 150 शाळा आणि 40 हजार मुलींपर्यत पोहोचत सुनंदा पवार यांनी महिला आरोग्याची मोठी चळवळ उभी केली आहे. महिला आरोग्य उत्तम असेल तर मन प्रसन्न राहते. परिणामी घर, कुटुंब आणि परिसर सुंदर आणि स्वच्छ राहील म्हणून महिला आणि मुली यांनी स्वतःच्या आरोग्याबरोबर इतरांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आज आपण आपला भारत जगाच्या पाठीवर महासत्ताक व्हावा, यासाठी प्रयत्न करत असताना. आपल्या देशातील वयात आलेल्या मुली आणि ग्रामीण महिलांचे आरोग्य याबाबत अनेक अडचणी आहेत. त्या अडचणी समजून घेत आपल्याला आरोग्याच्या समस्या समजून घ्याव्या लागतील आणि त्यासंबधी काम करावे लागेल.सामाजिक जाणिवा लक्षात घेता महिला आरोग्य याविषयी आपल्याला मनापासून काम करणे गरजेचे आहे. सॅनिटरी नॅपकिन हा विषय महिला आरोग्यासाठी गरजेचा असताना त्याविषयी अनेक शंका निर्माण केल्या जातात आणि हा महत्वाचा विषय टाळला जातो. मुली वयात आल्यानंतर त्यांच्यात नैसर्गिक शारीरिक बदल होत असतात हे बदल लक्षात घेता पालक म्हणून आपली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी म्हणून काही कर्तव्य आपण पार पाडणे गरजेचे आहे. आपण आपल्या मुलींशी मुक्तपणे चर्चा करा असे आवाहन या अभियानाच्या प्रमुख सुनंदा पवार यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)