मुलींचे मत विचारात घेतले तरच कायदे प्रभावशाली

जामखेड – मुलींना, शिक्षण, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन समान संधी देणारी कुटुंबे आणि समाज रचना राष्ट्र घडवू शकतो.मात्र, जेव्हा कुटुंब आणि समाज आपल्या मुलींचे मत विचारात घेतील, तेव्हाच हे कायदे प्रभावशाली ठरतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी केले.
येथील जुन्या पंचायत कार्यालयासमोरील प्रांगणात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्यावतीने किशोरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात महिलांना उद्योजकता, शिक्षण, कुपोषण आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.बचतगटांनी त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन, विक्री केली. सुमारे तीनशे विद्यार्थिनींनी तसेच महिलांनी घेतला सहभाग घेतला.

नागवडे अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी राजश्री जंबेनाळ, पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, गटविकास अधिकारी प्रज्ञा माने, नगराध्यक्षा अर्चना राळेभात, सारोळा गावचे सरपंच अजय काशीद, हळगावचे सरपंच राजेंद्र ढवळे, शिऊरचे सरपंच हनुमंत उतेकर, मच्छिंद्र ढेरे, केंद्रप्रमुख सातपुते, किशोरवयीन मुली, महिला पालक आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)