मुलींचा जन्मदर घटला…

महाराष्ट्राचा देशात पाचव्या स्थानावर


सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती

मुंबई – नीती आयोगाने जाहिर केलेल्या अहवालानुसार देशातील प्रमुख 21 राज्यांपैकी 17 राज्यांमध्ये मुलींच्या जन्म प्रमाणात घट झाली असून यामध्ये महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी विधानसभेत दिली.

राज्यात मुलींच्या जन्म प्रमाणात घट होत असल्याबद्दल विधानसभेचे सदस्य सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी ही माहिती दिली. नीती आयोगाच्या अहवालानुसार 2012 ते 2014 या वर्षांत देशातील 21 प्रमुख राज्यांपैकी 17 राज्यात मुलींच्या जन्मदरात घट झाली असून, महाराष्ट्र राज्याचा त्यात समावेश आहे. यानंतर नागरी सर्व्हे झाला. यानुसार राज्यात दर हजारी 904 इतकी मुलींची संख्या असल्याचा अहवाल आला आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

2011 ते 2017 मध्ये स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी व संदर्भातील कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी टोल फ्री नंबर सुरू केला. “आमची मुलगी’ हे संकेतस्थळ सुरू केले. साधारण 937 तक्रारी आल्या त्यापैकी 876 तक्रारीवर कारवाई पूर्ण केल्या. 85 सोनोग्राफी मशीन सील केल्या आहेत. अधिकाऱ्यांकडून 2018पर्यंत 8 हजार 73 सोनोग्राफी केंद्राची कायद्यांतर्गत नोंदणी झाली आहे. डिसेंबर 2017 मध्ये 580 खटले दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 328 अंतिम आहेत. 96 प्रकरणांत 110 लोकांना शिक्षा झाली. 93 जणांना सश्रम कारावास, 17 प्रकरणात दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)