मुलासह विवाहिता बोरमाळ वस्तीतून बेपत्ता

खेड-शिवापूर -(ता. हवेली) येथील बोरमाळवस्ती येथून एक विवाहिता सहा वर्षीय मुलासह राहत्या घरातून बेपत्ता झाली आहेत.
रूपाली फिरोज शेख (वय 25) असे या विविाहितेचे नाव असून मुलाचे नाव सूरज (वय 6) आहे. याबाबत या विवाहितेचा पती फिरोज शौकत शेख (सध्या रा. बोरमाळ, खेड शिवापूर; मूळ रा. टीहादु नौडपाडा पश्‍चिम बंगाल) याने खेड शिवापूर पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा पती 1 ऑगस्टला रात्री कामावरून घरी परतला असता घरात त्याची पत्नी आणि मुलगा दिसला नाही. यावेळी त्या दोघांचा बाहेर आणि मूळ गावी शोध घेतला असता ते कोठेही मिळून आले नाही. या महिलेचे नाव वर्णन – रंग काळा-सावळा, उंची अंदाजे 5 फूट 3 इंच, बांधा मजबूत, केस वेणी घालते, नाकात सोन्याची मुरणी, हिंदी बंगाली भाषा बोलते. तर मुलगा सूरजचा बांधा सडपातळ रंग काळा, उंची 2 फूट 5 इंच, केस मध्यम, हिंदी भाषा बोलतो असे यांचे वर्णन आहे. दोघेही हिंदी भाषा बोलतात. अशा वर्णनाच्या व्यक्ती कोठे आढळल्यास राजगड पोलीस ठाण्याशी (02113-272233) अथवा खेड शिवापूर पोलीस चौकीशी (020-24384252) संपर्क साधावा असे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)