मुलासमोरच पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या

महाबळेश्वर, दि. 6 (प्रतिनिधी) – धारदार शस्त्राने गळा चिरुन तसेच पाठीवर व पोटावर वार करत मुलासमोरच पतीने पत्नीचा खून केला. त्यानंतर पतीने स्वत:च्या पोटावरही वार करुन आत्महत्या केल्याची घटना महाबळेश्‍वर येथे घडली. अनिल सुभाष शिंदे (वय 34) व सिमा अनिल शिंदे (वय 30) अशी या घटनेतील मृतांची नावे असून हे दांपत्य पुणे येथील असून मुलासह ते महाबळेश्‍वर येथे पर्यटनासाठी आले होते.
धानोरी (पुणे) येथील विश्रांतवाडी येथे वास्तव्यास असलेला अनिल शिंदे हा बुधवारी पत्नी सिमा शिंदे व मुलगा आदित्य यांना घेऊन महाबळेश्‍वर येथे पर्यटनासाठी आली होता. महाबळेश्‍वर येथील एका लॉजमध्ये त्यांनी एक रुम घेतली होती. बुधवारी दिवसभर पर्यटन करुन झाल्यानंतर रात्री जेवण करुन अनिल पत्नीसह मुलाला घेऊन रुमवर आला. मध्यरात्री अनिल आणि सिमा या दोघांच्यात वाद सुरु झाला. यावेळी रागाच्या भरात अनिलने धारदार शस्त्राच्या सहाय्याने सिमाचा गळा कापला. या घटनेने सिमा जोराने ओरडू लागली. त्यामुळे रुममध्ये झापलेला त्यांचा मुलगा आदित्यही जागा झाला. यावेळी अनिल सिमाच्या शरिरावर चाकूच्या सहाय्याने सपासप वार करत होता. ही सर्व घटना पाहून भांबावलेला आदित्य आईला मारु नका अशी विनवनी वडिलांकडे करत होता. मात्र, रागाचा पार चढलेला अनिल काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हाता. त्याने पत्नी सिमाच्या अंगाव पंचवीसहून अधिक वार केले. सिमाचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच अनिलने स्वत:च्याही पोटात चाकूने सपासप वार करुन स्वत:लाही संपवून घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)