मुलाने केली आईला मारहाण

पिंपरी – भावाला टोमणे का मारतो, अशी विचारणा केल्याने चिडलेल्या मुलाने आईला पेव्हिंग ब्लॉकने मारहाण केली. ही घटना पिंपळे गुरव परिसरात घडली.

श्‍यामल अरुण भुजबळ (वय-55, रा. राजीव गांधी नगर, पिंपळे गुरव) असे मारहाणीत जखमी झालेल्या आईचे नाव असून त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमित अरुण भुजबळ (वय-35) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 8) रात्री आठ वाजताच्या सुमारास अमित हा घरी आला. तो भावाला टोमणे मारत बोलत असताना आई श्‍यामल यांनी त्यास असे का बोलतो, म्हणून विचारणा केली. या कारणावरून चिडलेल्या अमित याने पेव्हिंग ब्लॉकने आईला मारहाण करीत जखमी केले. सहायक निरीक्षक संजय निकुंभ याबाबत अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)