मुलाच्या शिक्षणासाठी आईने केली मोलमजुरी

हरेश गालवेला आर्थिक मदत त्याचा सत्कार करताना जिल्हा परिषद सदस्य सुगरा खोंदु व बशीर खोंदु

हरेश गालवेला लेट महंमदभाई ट्रस्टने केली मदत
मोरगिरी, दि. 28 (वार्ताहर) – मोरणा विभागातील गोकुळ तर्फे पाटण येथील हरेश दशरथ गालवे याच्या डोक्‍यावरच वडिलांचे छत्र हरवले असताना, घरची परस्थिति अत्यंत हालाखीची व मुलाला शिक्षण देण्यासाठी आईला मोलमजुरी करण्याशिवाय पर्यायच उरला नाही. अशा परिस्थितीत हरेशने 95.80 टक्के गुण मिळवून इतर विद्यार्थ्यांसमोर एक चांगला संदेश दिला आहे. हरेशला शिक्षणासाठी उभारी देण्यासाठी तसेच त्याच्या पुढील शिक्षणासाठी लेट महंमदभाई ट्रस्टने आर्थिक मदत केली आहे.
मोरणा विभागातील अतिदुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या गावातील मुलांना शिक्षण देण्यासाठी गोकुळ-धावडे येथील एका माळावर मोरणा शिक्षण संस्थेचे कार्यरत असलेले न्यु इंग्लिश स्कूलच्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेतलेला हरेश गालवे याने दहावीच्या परीक्षेत 95.80 टक्के गुण मिळवून स्वतः बरोबर शाळेचे व संस्थेचेही नाव उज्वल केले. तर मोरगिरी केंद्रात दुसरा क्रमांकही पटकावला आहे. सर्वच स्तरातून हरेशचे कौतुक होत आहे. मात्र, आता त्याला पुढील शिक्षणाची चिंता भेडसावत आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे तर त्याचे वडील हयात नाहीत. अशा परिस्थितीत आईने रोजंदारी व मोलमजुरी करून त्याला 10 वी पर्यंत कसेबसे शिक्षण दिले. आता मात्र त्याला पुढील शिक्षण कसे द्यायचे हा एक मोठा प्रश्न हरेशच्या आई पुढे उभा राहीला आहे. हरेशला पुढील शिक्षणासाठी आर्थिक पाठबळाची अत्यंत गरज आहे. हरेशने मारलेल्या उंच गरुड भरारीत जेवढे न्यु इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांचे श्रेय आहे, तेवढेच श्रेय त्याच्या आईलाही जाते. अत्यंत हालाखीच्या परस्थितीत मुलाला शिकवणे हे एक मोठे आवाहन त्याच्या आईपुढे होते. परंतु ते त्यांनी पुर्ण केले आणि त्याच्या मुलानेही परस्थितीची जाणीव ठेवत कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नसताना 95.80 टक्के गुण मिळवले, हेही कौतुकास्पद आहे. आता मात्र वेगवेगळ्या स्तरातून पुढील शिक्षणासाठी मदत मिळणे गरजेचे आहे. बशीर खोंदू यांच्या लेट महंमदभाई खोंदू ट्रस्ट मार्फत हरेशला मदत करण्यात आली आहे.

आईच्या कष्टाचे मोल करुन दाखवले
शाळेपासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर गोकुळ तर्फे पाटण या गावातील असलेला हा हरेश गालवे अत्यंत हालाखीच्या परस्थितीत शिक्षण घेत होता. डोक्‍यावरचे वडिलांचे छत्र हरवले होते. विशेष करून हरेश शाळेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी असायचा.त्याची आई शेतीवाडी काम करून त्यातून मिळालेली आर्थिक रक्कम त्याच्या शिक्षणासाठी वापरत असे. मात्र हरेशनेही त्याची जाणीव राखत आईच्या कष्टाचे मोल करून दाखवले असेच म्हणावे लागेल. असे मत शिक्षक नथूराम कुंभार यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)