मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आईला 10 वर्षे सक्तमजुरी

अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याने केली होती बॅटने मारहाण

पुणे – अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पोटच्या अपंग मुलाला बॅटने मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या नराधम आईला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 500 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी हा आदेश दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राखी तरूण बालपांडे (वय 41) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. चैतन्य तरूण बालपांडे (वय 13, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे मृत मुलाचे नाव आहे. ऑगस्ट 2015 मध्ये घडलेल्या घटनेबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. राखी मूळची नागपूरची असून, तिचे तिच्या पतीशी पटत नव्हते. याच दरम्यान दोघांच्यात घटस्फोटाची प्रक्रीया सुरू होती. राखी बालपांडे ही उच्चशिक्षीत असून वाकड येथे एका कंपनीत एचआर म्हणून कार्यरत होती. राखी बालपांडे ही घटनेच्या दोन वर्षापासून विश्रांतवाडीतील टिंगरेनगर परिसरात राहत होती. तिचे फ्लॅट मालक असलेल्या सुमित मोरे याच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले होते.

घटनेच्या 2 वर्षांपूर्वी राखी पुण्यात आल्यानंतर चैतन्यला पुणे एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये टाकले होते. ती त्याचा चांगला सांभाळ करत होती. चैतन्य पायाने अपंग होता. त्यामुळे यापूर्वी राखी त्याची काळजी घ्यायची. राखीच्या घरी सुमित आणि त्याच्या दोन मित्राचे सारखे येणे-जाणे होते. चैतन्य आता 13 वर्षाचा असल्याने त्याला सर्व समजत होते. राखीला त्याची अडचण होऊ लागली होती. त्यातच तो अपंग असल्याने कायम घरातच राहायचा. राखी आणि सुमितला चैतन्य अडसर ठरू लागल्याने त्याला बॅटने मारहाण करून खून केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली.

सुरुवातीला तो पडल्याने त्याला मार लागल्याचे सांगण्यात आले. परंतु, तपासाअंती चैतन्यला बॅटने मारहाण झाल्याचे समोर आहे. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी काम पाहिले. चैतन्य हा अपंग आणि तेरा वर्षाचा होता. त्याने पूर्ण जगही पाहिले नाही. त्याचा त्याच्या आईवर विश्‍वास असताना तिने अशा प्रकारचे कृत्य केले. मुलाला बॅटने मारहाण करून त्याला जखमी केले, त्यामुळे त्याला त्याचा जीव गमवावा लागला असल्याचा युक्तीवाद करत त्यांनी राखीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने राखीला खूनप्रकरणी दोषी न धरता सदोष मनुष्यवध प्रकरणी शिक्षा सुनावली. तर, सुमित मोरे विरुद्ध सबळ पुरावे न आढळल्याने त्याची न्यायालयाने मुक्तता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)