मुलाच्या अपेक्षेने देशात 2 कोटी 10 लाख मुलींचा झाला जन्म

नवी दिल्ली : आजही आपल्या देशात मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक करण्यात येतो. याचे उदाहरण म्हणून यंदा करण्यात आलेले आर्थिक सर्वेक्षण आहे. कारण देशात 2 कोटी 10 लाख मुली जन्माला आल्याची धक्कादायक बाब या  सर्वेक्षणातून समोर आली आहे.
2017-18 च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून भारतातील जवळपास २ कोटी १० लाख पालकांची पुत्ररत्न व्हावं अशी इच्छा होती मात्र, त्यांना कन्यारत्न झालं, अशी धक्कादायक आकडेवारी हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतो. सध्याच्या लोकसंख्येतील शून्य ते २५ वर्ष वयोगटातील मुली या पुत्राला प्राधान्य देणाऱ्या पालकांनी कन्यारत्न झाल्यानंतरही संतती नियमन न करता पुत्रप्राप्तीची इच्छा ठेवलेल्या पालकांच्या आहेत. इतकंच नाही, तर भारतातील बेपत्ता मुलींचे प्रमाण दिले होते. त्याहीपेक्षा नकोशा मुलीचे प्रमाण जास्त आहे. २०१४ मध्ये बेपत्ता मुलींची संख्या अंदाजे ६ कोटी ३० लाख इतकी होती. एका मुलीमागे १.०५ मुलगे असे नैसर्गिक प्रमाण असते. पण, शेवटचे अपत्य मुलगा असण्याचे प्रमाण जास्त आहे. पहिल्या क्रमांकाच्या अपत्यासाठी हे प्रमाण १.८२ इतके आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी ते १.५५ आणि तिसऱ्यासाठी १.६५ असे आहे. देशाला लैंगित समानता आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत, ज्यामुळे लैंगिक समानतेमध्ये भारताच्या क्रमवारीत सुधारणा होऊ शकते, असा सल्ला दिला जातो आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)