मुलाचा ताबा आईकडे द्या : न्यायालयाचा आदेश

पत्नीकडे असलेल्या तीन वर्षाच्या मुलाला पळवून आणले होते

पुणे – पत्नीकडे असलेल्या तीन वर्षांच्या मुलाला पळवून नेऊन त्याचा ताबा परत न देणाऱ्या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. मुलाचा ताबा आईकडे देण्यात यावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. अर्जदार महिलेने दि. 23 मे रोजी मुलाचा ताबा मिळावा म्हणून घरगुती हिंसाचार कायदा कलम 21 नुसार अर्ज दाखल केला होता. अर्जदार यांचा पती शैलेश राजेंद्र कुचेकर याने त्यांच्या माहेरी जावून त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करून जबरदस्तीने त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाला पळवून नेले होते.

मुलाचा ताबा द्यावा म्हणून त्यांनी वारंवार विनवणी केली होती. मात्र, त्याने नकार दिला. अर्जदार महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्यांना न्यायालयाचा आदेश घेऊन या तरच आम्ही तुम्हाला मदत करु, असे सांगितले. अर्जदार यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. थोडगे यांच्या न्यायालयात मुलाचा ताबा मिळावा म्हणून अर्ज दाखल केला. या अर्जावर लवकर सुनावणी होवू नये म्हणून तारखेला हजर न राहणे, तारीख घेऊन लवकर निघून जाणे प्रकार अर्जदाराच्या पतीकडून करण्यात येत असल्याचे अर्जदार यांचे वकील ऍड. जयपाल पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने मुलाच्या वयाचा विचार करुन मुलाला मातृत्वाची आणि संगोपनाची गरज असल्याने मुलाचा ताबा आईकडे देणे न्यायाच्या दृष्टीने योग्य आणि उचित होईल.

तसेच शैलेश याला दारुचे व्यसन असून तो सतत नशेत असतो. त्यामुळे तो अर्जदारांच्या घरी रात्री बेरात्री येवून मानसिक आणि शारीरिक छळ करत असतो. त्यामुळे त्याला अर्जदार यांच्या घरी जाण्यास प्रतिबंध केलेला आहे. अर्जदार महिलेतर्फे ऍड. विजयसिंह ठोंबरे, ऍड. जयपाल पाटील, ऍड. हितेश सोनार यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)