मुलांवर स्वत:ची स्वप्ने लादू नका

डॉ. हमीद दाभोळकर : मुक्तांगणमध्ये विवेक मुल्ये-पालकत्त्व परिसंवाद

इस्लामपूर, दि. 2 (प्रतिनिधी) – हाताचे ठसे पाहून मुलांची केलेली कलचाचणी म्हणजे भविष्य सांगण्याचा नवा फंडा आहे. पालकांनी त्याला बळी पडू नये. मुलांना स्वप्ने साकार करण्यासाठी पालकांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावायला हवी. स्वतःची स्वप्ने मुलांवर लादू नका. मुलांचे मालक नाही तर चांगले मित्र बना, असे मत मानोपसचार तज्ज्ञ डॉ. हमीद नरेंद्र दाभोळकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, मुक्तांगणची उपक्रमशिलता आदर्शवत असल्याचे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले.
इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये “विवेकी मूल्ये – संस्कार आणि पालकत्व” या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. संजय बनसोडे उपस्थित होते.
डॉ. दाभोळकर म्हणाले, “मला जे जमले नाही, ते मी मुलांकडून करवून घेणारच, ही वृत्ती बदलायला हवी. मुलांना कोणत्याही अटीशिवाय स्वीकारायला हवे. मुलाना स्वतंत्र व्यक्तीमत्व घडवण्यासाठी मोकळीक द्यावी. प्रत्येक मुल हे वेगळे आहे. ते त्याच्या क्षमतेने फुलणार आहे. यामुळे मुलांच्यात तुलना करू नका. पालकत्व हे संरक्षित झाले आहे. मुलांनी पडले नाही पाहिजे, त्याला लागले नाही पाहिजे. पण सर्वच क्षेत्रांत यशाच्या शिखरावर पाहिजे ही भूमिका चुकीची आहे. मुलांना मोकळीक द्यावी. विश्वास द्यावा. प्रत्येक कृतीत यश मिळवले पाहिजे हा अट्टहास सोडायला हवा. मुलांसाठी पालक हेच आदर्श असतात. यामुळेच पालकांनी आपल्या वर्तनात सकारात्मक बदल स्वीकारले पाहिजेत.”
डॉ. दाभोळकर म्हणाले, “मुक्तांगण हे मुलांना नव्या जगाची ओळख करून देणारे खेळघर आहे. येथे वेगवेगळ्या अनुभवातून शिक्षण दिले जाते, प्रत्यक्ष अनुभव दिले जातात. विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. बालवयात दिलेल्या मूल्यांचा परिणाम दीर्घकालीन टिकतो. मुक्तांगणमधील सर्वच उपक्रम हे कौतुकास्पद आहेत.
संजय बनसोडे, सचिव विनोद मोहिते यांचीही भाषणे झाली. पालकांनी मुलांना वेळ द्यायला हवा. यावेळी पालकांच्या विविध प्रश्नांना डॉ. दाभोळकर यांनी उत्तरे दिली. प्रारंभी संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी स्वागत केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)