मुलांमध्ये मानसिक आजार वाढतोय – डॉ. आदित्य पाटील

निगडी – सध्या समाजातील 20 टक्के मुलांमध्ये काही ना काही मानसिक आजाराची लक्षणे आढळून येत आहे. मुलांमध्ये वाढत असलेला मानसिक आजार ही सामाजिक समस्या बनत आहे. पालकांनी वेळ काढून मुलांसोबत संवाद साधत त्यांच्या मानसिक आजाराकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मत मनोविकारतज्ज्ञ डॉ. आदित्य पाटील यांनी केले.

तळवडे येथील सरस्वती विश्व विद्यालय नॅशनल स्कूलच्या वतीने लहान मुलांचे मानसिक आजार या विषयावर शिबिराचे आयोजन केले होते. त्यात डॉ. आदित्य पाटील यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे अध्यक्ष विश्वनाथ नायर, संचालिका स्मिता नायर-कुरुप, मुख्याध्यापिका क्षमा गर्गे आदी उपस्थित होते. पालक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ पाटील पुढे म्हणाले की, बदलती जीवनशैली, स्पर्धात्मक युग, फ्लॅट संस्कृती, पालक – मुले यांच्यातील नात्यात आलेला दुरावा या करणाने मुले मानसिक आजाराला बळी पडत आहेत. चिडचिड करणे, एकटे राहणे, रात्री जागरण करणे, भूक न लागणे, रडू येणे, स्वतःसोबत बडबड करणे, काळजी न घेणे, अभ्यासातील प्रगती कमी होणे ही सर्वसाधारण मानसिक आजारीचे लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत. आपली मुले मानसिक आजाराला बळी पडू नये यासाठी पालकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे. त्यांच्यातील आजार ओळखून मुलांना मानसोपचारतज्ज्ञ व मनोविकारतज्ज्ञांकडे नेवून उपचार करून घ्या.

मुलांसोबत वेळ घालवावा. मुलांवर कोणत्याही अपेक्षांचे ओझे न लादता विनाअट त्यांचा स्वीकार करा, मुलांच्या भावना ओळखा, त्यांना सन्मान द्या, मुलांसोबत मैदानी खेळ खेळा. पालकांनी मुलांसाठी एक आदर्श बनावे. पालक व मुले यांच्यातील संबंध सुदृढ करावे, असा सल्ला पालकांना दिला. यावेळी स्मिता नायर यांनी शाळेतील घडत असलेल्या दुर्घटना व व्यसनाधीनता याविषयी माहिती दिली. दीपा भसीन यांनी सूत्रसंचलन केले व आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)