मुलांनी लुटला आठवडी बाजाराचा आनंद

विडणी – उत्तरेश्‍वर हायस्कुल व ज्युनि. कॉलेज विडणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विद्यालयात आठवडी बाजाराला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. गावातील मुलांना विद्यार्थी दशेतच व्यवहार ज्ञान मिळावे, भाजीपाला विक्री कशी करतात, हे अनुभवता यावे यासाठी आठवडी बाजाराचे आयोजन या जयंती महोत्सवात केले जाते.

यावेळी फळे, भाजीपाला, खाण्याचे पदार्थ, नाश्‍ता, चहा, गृहोपयोगी वस्तू, पुस्तके अशा वेगवेगळ्या प्रकारच्या या आठवडी बाजाराने विद्यालयाचे प्रांगण गजबजून निघाले होते. यावेळी खरेदीसाठी विद्यार्थी व पालकांची एकच भाऊगर्दी पहावयास मिळाली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)