मुलांना भवितव्य घडविण्याचे स्वातंत्र्य द्या : नितीन थाडे

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना नितीन थाडे व शेजारी मान्यवर

सातारा,दि.14 प्रतिनिधी- पालकांनी मुलांना आपले भवितव्य घडविण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहन डीआरडीएचे प्रकल्प संचालक, सातारा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे यांनी केले. येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने वी व वी परीक्षेत विशेष गुण मिळवलेल्या सातारा परिसरातील शाळा महाविद्यालयातील खुल्या सह सर्व प्रवर्गनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पुस्तक व स्मृती चिन्ह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन करण्यात आला. त्याप्रसंगी नितीन थाडे बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, अखिल भारतीय विमा कामगार संघटनेचे उपाध्यक्ष कॉंम्रेड वसंतराव नलावडे होते. विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे, कार्यवाह अँड. हौसेराव धुमाळ, विश्वस्त रमेश इंजे व सामाजिक कार्यकर्ते प्रा. रमेश ओहळ उपस्थित होते.
नितीन थाडे म्हणाले, पालकांनी आपल्या इच्छांचे ओझे मुलांवर लादू नये. त्यांची आवड निवड लक्षात घेऊन अभ्यासक्रम व्यवसाय निवडीसाठी पुर्ण वाव दिल्यास त्यांना हव्या त्या क्षेत्रात झेप घेता येईल. कॉं.वसंत नलावडे म्हणाले, कठोर परिश्रम, चिकाटी व सखोल वाचन अभ्यास आणि संघर्षाचे जोरावर यशाचे शिखर गाठता येईल. प्रा.रमेश ओहळ तसेच गुणवंत विद्यार्थी पियुष काकडे, इंद्रसिंग वळवी, रुक्‍सार रज्जाक सय्यद, महम्मद तोहिद, आकांक्षा म्हैत्रस यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. प्रा. प्रशांत साळवे यांनी आभार मानले. रमेश इंजे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. हौसेराव धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. होवाळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास संबोधी प्रतिष्ठानचे विश्वस्त, पदाधिकारी, सभासद विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते , तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)