मुलांना कसे शिकवावे? शिक्षक-पालकांची कार्यशाळा

निगडी – मुलांना कसे शिकवावे आणि कसे घडवावे, यासाठी “उमलते वय आणि कौशल्य’ विषयावर शिक्षक आणि पालकांची तीन दिवस कार्यशाळा झाली. मोठ्या संख्येने शिक्षक व पालक सहभागी झाले होते. विद्यानंद भवन हायस्कूल निगडी येथे लायन्स क्‍लब ऑफ पुणे भोसरी यांनी कार्यशाळेचे आयोजन केले.

चारित्र्य संवर्धन व जबाबदार नागरीक होण्यासाठी लहान वयातच पालक, शिक्षक यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मुलांना समजावून घेऊन बदलांना योग्य पद्धतीने हाताळल्यास मुले सृजनशील व जबाबदार नागरीक नक्कीच बनतील, असे प्रतिपादन लायन्स क्‍लबचे आंतर राष्ट्रीय प्रशिक्षक बी. एल. जोशी यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लायन्स क्‍वेस्ट डीस्ट्रिक्‍टच्या प्रमुख शैलजा सांगळे, लायन्स क्‍लब ऑफ पुणे भोसरीच्या अध्यक्षा सीमा पारेख, विद्यानंद माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यपिका छाया हब्बू उपस्थित होत्या.

लायन्स क्‍वेस्टचे आंतर राष्ट्रीय प्रशिक्षक लायन बी. एल. जोशी यांनी आंतर राष्ट्रीय कृतीयुक्‍त अध्यापनात मनोरंजक मांडणी कशी करावी, हे शिकवले. शिक्षक, पालकांनी विविध प्रात्यक्षिकात उस्फूर्त सहभाग घेतला. साहेबराव जाधव, दिपाली वानखेडे, तृप्ती हांडे, वैशाली नाझीरकर, राधिका नबियार यांनी विचार व्यक्‍त केले. उप प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, अतिरिक्‍त जिल्हा प्रमुख श्‍याम माने, माजी अध्यक्ष लायन सुनिल पारेख, असित सिन्हा, सरस सिन्हा समारोपास उपस्थित होते. उप प्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांच्या हस्ते सर्व पालक व शिक्षकांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. मुख्याध्यपिका छाया हब्बू, पर्यवेक्षिका जया श्रीनिवासन यांचा विशेष सत्कार केला.

हा कार्यक्रम प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. जया श्रीनिवासन यांनी सूत्रसंचालन केले व साहेबराव जाधव यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)