मुलांच्या बौद्धिक विकासासाठी खेळणी

पिंपरी – बालवाडी व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारिरीक क्षमतेत वाढ होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका महिला बाल कल्याण विकास समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत खेळणी वाटपाला महिला बाल कल्याण सभापती सुनिता तापकीर यांच्या हस्ते आज (सोमवारी) सुरुवात करण्यात आली.

रहाटणी कन्या, मुले, शाळा क्र. 55 येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका सविता खुळे, निर्मला कुटे, बालवाडीच्या मुख्य समन्वयक संजीवनी मुळे, अरुणा शिंदे, मुख्याध्यापिका रेहाना अत्तार, चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, शुभम नखाते, शाम राजवाडे, श्रीराम कुटे, नरेश खुळे, विलास काटे आदी उपस्थित होते.

सुनिता तापकीर म्हणाल्या की, महापालिकेकडून शहरातील सर्व बालवाड्यांना बौद्धिक खेळणी व साहित्य वाटण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक व सामाजिक क्षमतेत वाढ होणार आहे. महापालिकेच्या 206 बालवाडीतील 7200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियान उपक्रमांतर्गत यापुर्वीच सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थींनींना सॅनिटरी नॅपकीन वाटप सुरु करण्यात आले आहे. हे उपक्रम महाराष्ट्रात सर्व प्रथम पिंपरी-चिंचवड मनपा राबवित आहे. तसेच, या शिक्षकांचे मानधन वाढीबाबतचा प्रश्न महापालिका लवकरच सोडवेल असा विश्वास तापकीर यांनी व्यक्त केला.

नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका सविता खुळे, निर्मला कुटे यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. स्वागत मुख्याध्यापिका रेहाना अत्तार, सूत्रसंचालन गणेश लिंगडे, आभार संजिवनी मुळे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)