मुलांची झोपेत अंथरुण ओले करण्याची समस्या विकासप्रकियेशी

डॉ. अमिता फडणीस : मूत्रप्रवृत्तीबद्दलच्या समस्यांवर विशेष प्रशिक्षण सत्र

प्रभात वृत्तसेवा
पुणे,- लहान मूल झोपेत अंथरूण ओले करत असेल तर त्याचा संबंध बहुतेकवेळा मानसिक दडपणाशी जोडला जातो. परंतु “बेडवेटिंग’ ही मानसिक समस्या नव्हे. ही समस्या प्रामुख्याने लहान मुलांमधील विकासप्रक्रियेशी अर्थात “मॅच्युरेशनल डीले’शी संबंधित असते, असे मत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व “ओएनपी’ रुग्णालयाच्या संचालिका डॉ. अमिता फडणीस यांनी व्यक्‍त केले.रुग्णालय आणि कोथरुड डॉक्‍टर्स असोसिएशनतर्फे मूत्रप्रवृत्तीबद्दलच्या समस्यांवर विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी “बेडवेटिंग’ या विषयावर डॉ. फडणीस बोलत होत्या.
“रात्रीच्या वेळी अति प्रमाणात मूत्रप्रवृत्ती होणे’ या विषयावर डॉ. सागर भालेराव यांनी, तर “महिलांमध्ये लघवीवर ताबा न राहणे’ या विषयावर डॉ. मीनल मेहेंदळे यांनी, तसेच कोथरुड डॉक्‍टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद जंगम, सचिव डॉ. बाबासाहेब मुंढे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. जवळपास 4 ते 14 टक्‍के लहान मुलांमध्ये रात्री अंथरुणात नकळत लघवी होण्याची समस्या आढळते, असे सांगून डॉ. फडणीस म्हणाल्या, “बेडवेटिंग’च्या समस्येबाबत शरीरात “एडीएच’ (अँटीडाययुरेटिक हॉर्मोन) या हॉर्मोनचे स्त्रवण योग्य प्रकारे न होणे किंवा लहान मुलांमधील “मॅच्युरेशनल डीले’ हे प्रमुख सिद्धांत मांडले जातात.
झोपेत लघवी लागल्याची संवेदना होऊन जाग येणे आत्मसात करण्यात काही मुलांना वेळ लागतो. ही समस्या वयाबरोबर कमी होणारी असली तरी त्यामुळे लहान मुलांच्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे “बेडवेटिंग’वर वेळीच डॉक्‍टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. काही साध्या वैद्यकीय उपायांनीही “बेडवेटिंग’ आटोक्‍यात आणता येते. “बेडवेटिंग’ची समस्या बंद झाल्यानंतर 6 महिन्यांनी ती पुन्हा सुरू झाली तर त्याचे कारण मानसिक दडपणाशी जोडलेले असू शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)