मुलभूत असुविधेमुळे क्रीडापटूंच्या कामगिरीवर परिणाम

कोट्यवधीचा खर्च करूनही क्रीडापटूंना अपूऱ्या सुविधा कॅगचा ठपका

मुंबई  – राज्यातील क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक धोरणे आखली गेली आहेत. या धोरणाच्या अमंलबजावणीसाठी 576 कोटी रूपये केल्यानंतरही क्रीडा क्षेत्रात पुरेशा मुभूत सुविधा निर्माण करण्यात तसेच त्यांची देखभाल करण्यात आणि क्रीडापटूंना सुविधा देण्यात क्रीडा विभाग असमर्थ ठरले आहे. या अपुऱ्या सुविधेमुळे क्रीडापटूंच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचा ठपका कॅगने क्रीडा विभागावर ठेवला आहे.

राज्य शासनाने राज्याच्या संपन्न क्रीडा संस्कतीचे जतन करण्यासाठी आणि राज्यातील क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन 2012 क्रीडा धोरण आखले होते. शासनाने जरी क्रीडा धोरण आखले असले तरी त्याचा क्रीडा आराखडा अद्याप तयार केला नसल्याचे 2012-2017च्या लेखापरिक्षणात निदर्शनात आले, असे कॅंगने म्हटले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही दीर्घावती योजना तयार करण्यात आली नव्हती. जमिन संपादन न होणे, कमी निधी किंवा विलंबाने निधी प्राप्त होणे, कामांच्या व्याप्तीत बदल होणे आदी कारणांमुळे निर्माण केलेल्या मूलभूत सुविधांचा योग्य उपयोग झाला नसल्याचे कॅगने नमूद केले आहे.

अकादमीच्या कामात देखील अनेक अडचणी उद्भवल्याचे कॅंगने निदर्शनास आणून दिले आहे. कमी प्रवेश, अपूरे प्रशिक्षण, क्रीडा सुविधा आणि मुलभूत सुखसोयी यांचा अभाव यामुळे राष्ट्रीय , राज्य व आंतरराष्ट्रीय खेळांवर त्याचा प्रभाव पडला. क्रीडा संबंधातील मूलभूत सुविधांच्या निर्मितीवर जरी भर देण्यात आला असला तरीही पात्रतापूर्ण आणि सक्षम प्रशिक्षक व प्रशिक्षणाच्या अभावी परिणामकारक यश मिळवण्यात अपयश आल्याचे कॅंगने आपल्या अहवालात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)